Rain : श्रीरामपुरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

Rain : श्रीरामपुरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

0
Rain : श्रीरामपुरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Rain : श्रीरामपुरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

Rain : श्रीरामपूर: तालुक्यातील सर्वच भागात काल संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत परतीच्या पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतातील सोंगणीला आलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान (loss) झाले. तसेच अनेक भागात वेचणी सुरू झालेल्या कपाशी (Cotton) पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी! पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

ओढे, नाले व रस्त्यावरून वाहिले पाणीच पाणी

बुधवारी (ता.२५) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या जोरदार पावसाच्या सरींमुळे नदी, नाले, ओढे आणि रस्त्यावरून पाणीच पाणी वाहिले आहे. तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. भोकर, खोकर, मुठेवाडगाव, नाउर, जाफराबाद, खरी निमगाव, खानापूर, कमलपूर, भामाठाण, टाकळीभान, वडाळा महादेव, अशोकनगर, निपाणी वडगाव, मतापूर सह अनेक गावाच्या परिसरात पाऊस दमदार बरसला. दोन ते तीन दिवसांपासून वातावरणातही कमालीचा उकाडा वाढला होता. त्यामुळे हैराण झालेले श्रीरामपूर शहरातील नागरिक या पावसाने चांगलेच सुखावले आहेत. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.

अवश्य वाचा: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज

सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान (Rain)

अनेक भागातील व्यावसायिकांच्या दुकानात या पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी जुन्या रस्त्यांसह नवीन केलेले रस्ते देखील जोरदार पावसामुळे खचले आहेत. तालुक्यातील काही भागात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. यात प्रामुख्याने सोंगणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात सोंगलेल्या सोयाबीनचा अक्षरशः चिखल झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांची मका पिकाची चाऱ्यासाठी कुट्टी करून घेयुन तो चारा दुधाळ जनावरांसाठी साठवण्याची धावपळ सुरू आहे. या पावसामुळे या कामालाही ब्रेक लागला आहे. अनेक भागात हंगामाच्या सुरुवातीलाच लावलेल्या कपाशी पिकाची वेचणी सुरु झाली आहे. या पावसाने वेचणीला आलेला हा कापूस भिजून त्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Rain : श्रीरामपुरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Rain : श्रीरामपुरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी


नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी कृषी विभागासह पीक विमा कंपनीकडे करण्यात येत आहे. 72 तासांच्या आत नुकसानीची तक्रार दाखल करण्याच्या जाचक अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई पासून वंचित राहावे लागणार असल्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, उशिराने पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, ऊस, बाजरी, मका व चारा पिकांना मात्र या पावसामुळे फायदा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here