Rain : संगमनेरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग

0
Rain : संगमनेरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग
Rain : संगमनेरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग

Rain : संगमनेर : शहरासह तालुक्यात पावसाने (Rain) मंगळवारी (ता. ११) दुपारीच जोरदार हजेरी (Heavy rain) लावली. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचले होते. अनेक भागात वाहतूक खोळंबली (Traffic Disrupted) होती तर काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

नक्की वाचा : हिंदू धर्मात प्रवेश केलेला शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार; आर्थिक अडचणीमुळे निर्णय

या भागांमध्ये जोरदार पाऊस (Rain)

मंगळवारी (ता. ११) सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी चार वाजता पावसाला सुरुवात झाली. संधकाळी उशिरापर्यंत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. सर्वत्र वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. संगमनेर शहर पठार भागातील ठाकूर बोटा घारगाव परिसरातील गावे तसेच संगमनेर खुर्द, खांडगाव, कासारा दुमाला, गुंजाळवाडी, वेल्हाळे, राजापूर, जवळेकडलग, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, कवठे धांदरफळ, कोल्हेवाडी, घुलेवाडी, सुकेवाडी, समनापूर, जोर्वे, निंबाळे, तळेगाव दिघे, सोनोशी, नान्नज, काकडवाडी, चिंचोली गुरव, पारेगाव बुद्रुक, डोळासने, चंदनापुरी, धुळे निमज, सावरगाव तळ, हिवरगाव पावसा, वाघापूर, खराडी आदी गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

Rain : संगमनेरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग
Rain : संगमनेरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग

अवश्य वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

अनेक दुकाने घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले (Rain)

संगमनेर शहरातील बसस्थानक परिसर, नवीन नगर रस्ता, भारत नगर, कोल्हेवाडी रस्ता, अलका नगर आदी परिसरात पावसाचे पाणी साचले होते तसेच अनेक दुकाने घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. अनेक नाल्यात तुमच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नगरपरिषदेच्या व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. संगमनेर पंचायत समिती समोर रस्त्यावरही पाणी साचलेले पाहायला मिळाले.

माझ्या घरामध्ये पाणी शिरले. मालदाड रस्ता परिसरांच्या गटारांचे पाणी आमच्याकडे येते. त्यामुळे साईश्रद्धा चौक व तिरंगा चौक येथील पावसाचे पाणी जाण्यासाठी काहीच सोय नसल्यामुळे आमच्याकडे ते सगळे पाणी वैदूवाडी येथे येऊन सगळ्यांच्या घरात आले. हे पावसाळ्यात नेहमीच घडते. त्यामुळे नगरपालिकेने काही तरी उपाय करावी.

  • शंकर गायकवाड, रहिवासी, वैदूवाडी, संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here