Rain : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

Rain : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

0
Rain : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला
Rain : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

Rain: श्रीरामपूर: शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वदूर हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस (Rain) झाल्याने आता शेतीच्या (Agriculture) कामाला चांगलाच वेग आला आहे. तालुक्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा (Farmer) सुखावला असून खते व बी बियाणांच्या दुकानांत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडालेली दिसत आहे.

नक्की वाचा : हिंदू धर्मात प्रवेश केलेला शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार; आर्थिक अडचणीमुळे निर्णय

तालुक्यात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी (Rain)

रविवारी (ता.९) दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर सोमवारीही  दुपारपर्यंत पावसाची भुरभुर सुरू होती.त्यामुळे शेतशिवरात जमिनीत ओल चांगली झाली आहे. त्यामुळे कपाशी लागवडीला वेग आलेला आहे. सोयाबीन आणि मका पिकांची पेर शेतकरी अजून एखादा पाऊस झाल्यानंतर करतील असे दिसते. तालुक्यात काही ठिकाणी धूळ पेर केली जात आहे.
यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

अवश्य वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

समाधानकारक पावसामुळे कपाशीच्या लागवडी सुरू (Rain)

तालुक्यात मान्सूनचे योग्य वेळी आगमन झाले असल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगामाकडून आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चाराही आता उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील खैरी निमगाव,गोंडेगाव, खोकर, भोकर, टाकळीभान, कमलापूर, भामाठण, खानापूर, गुजरवाडी, खिर्डी, वांगी, कारेगाव, मातापूर, मालुंजा, बेलापूर, पढेगाव, खंडाळा यासह गोदापट्टा व प्रवरा पट्ट्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने कपाशीच्या लागवडी सुरू केल्या आहेत. कपाशी सह सोयाबीन व मका पिकाखालील क्षेत्र यंदा तालुक्यात वाढणार आहे. सोयाबीनच्या घटलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला असला तरी जास्तीचे क्षेत्र असलेले शेतकरी सोयाबीन पिकाला पसंती देताना दिसत आहेत. यासह पाण्याची परिस्थिती पाहून उसाच्या आडसाली लागवडींकडे देखील बळीराजाचा कल असल्याचे दिसून येत आहे. चांगल्या पावसाने गेल्या काही महिन्यांपासून आटलेल्या बोअर व विहिरींना आता काही प्रमाणात पाणी आले आहे. या पावसामुळे शहरासह तालुक्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here