Rain : कर्जत शहराला दमदार पावसाने झोडपले

Rain : कर्जत शहराला दमदार पावसाने झोडपले

0
Rain

Rain : कर्जत : कर्जत शहरात (Karjat City) गुरुवारी (ता.१७) दुपारी विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास मान्सून परतीच्या मुसळधार पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना जलाशयाचे स्वरूप आले होते. मंगळवारी, दुपारी देखील वादळी- वाऱ्यासह (Stormy Wind) झालेल्या पावसाने तालुक्यातील थेरवडी आणि देशमुखवाडी भागात लिंबू, केळी, पेरू बागेचे मोठे नुकसान झाले होते.

अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे

विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस

मान्सून परतीच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारनंतर गुरुवारी देखील कर्जत शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील बसस्थानक परिसर, दादा पाटील महाविद्यालयाच्या लगत यासह अमरनाथ विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मुख्य रस्त्यास तलावाचे स्वरूप आले होते.

Rain

नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

नागरिकांची उडाली धांदल (Rain)

अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वसामान्य नागरिकांची मोठी धांदल उडाली. शाळा सुटताना पडलेल्या पावसाने विद्यार्थ्यांसह पालकांची देखील पंचायत झाली. मंगळवारी झालेल्या वादळी-वाऱ्याच्या पावसाने कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घरावर वीज कोसळल्याने भिंतीस आणि स्लॅबला तडे गेले. तर नांदगाव येथील लखन बाजीराव बागल या पशुपालकांचा बैल वीज पडून जागीच गतप्राण झाला. यासह देशमुखवाडी आणि थेरवडी येथील एकूण ७ शेतकऱ्यांच्या केळी, लिंबू व पेरूच्या बागेचे मोठे नुकसान झाली असल्याची माहिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली. सदर नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक कर्मचाऱ्यांना दिले आहे.