Rain : पावसाची संतत धार ; जनजीवन विस्कळीत

Rain : पावसाची संतत धार ; जनजीवन विस्कळीत

0
Rain : पावसाची संतत धार ; जनजीवन विस्कळीत
Rain : पावसाची संतत धार ; जनजीवन विस्कळीत

Rain : श्रीगोंदा : मागील २० दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने (Rain) कांद्यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पूर्व मोसमी पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः पाण्याअभावी अडचणीत आलेल्या ऊस आणि फळबागांना जीवनदान मिळाले आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे.

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

पावसाच्या हजेरीने फळबागांना जीवदान

तालुक्यातील ११ महसूल मंडलांमध्ये गेल्या २० दिवसांत एकूण सुमारे १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये कोळगाव मंडलात सर्वाधिक १८८ मिलिमीटर तर लोणीव्यंकनाथ मंडलात सर्वांत कमी ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुकडीच्या पाण्यासाठी उडालेली तारांबळ, घोड पट्ट्यातील खालावलेली पाणीपातळी आणि अन्य भागातील पाणीटंचाई यामुळे तालुक्यात मे महिन्यात भीषण चित्र निर्माण झाले होते. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने फळबागांना चांगलाच फटका बसू लागला होता. कित्येक शेतकऱ्यांनी फळबागांना टँकरने पाणी देण्यास सुरुवात केली होती. ५ मेपासून तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी त्यातून बहुतांश शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या हजेरीने फळबागांना जीवदान मिळाले आहे.

अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ३७.३९ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी भाजीपाला, कांदा, आंबा, केळी, पपई, डाळिंब, लिंबू, खरबूज आदी पिकांचे नुकसानीची नोंद झाली आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी शशिकांत गांगर्डे यांनी या भागात जाऊन पाहणी केली.

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

५ मेपासून झालेल्या पावसाची आकडेवारी (Rain)

(संख्या मिलिमीटरमध्ये)

श्रीगोंदे – १२०, काष्टी – १३२, मांडवगण – १४३, बेलवंडी – १०२, पेडगाव – १७४, चिंभळा – १४०, देवदैठण – ८१, कोळगाव – १८८, लोणी व्यंकनाथ – ६५, भानगाव – १०२, आढळगाव – १३३.
तालुका सरासरी – १२५