Rain Alert: राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार;पंजाबराव डख यांचा अंदाज

0
Rain Alert:राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार;पंजाबराव डख यांचा अंदाज
Rain Alert:राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार;पंजाबराव डख यांचा अंदाज

नगर : राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. तर काही भागात तुरळक पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी -नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी हवामानाबाबतचा नवीन अंदाज (Weather forecast) वर्तवला आहे. राज्यात २० जूनपर्यंत भाग बदलत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असं आवाहनही करण्यात आलं आहे.

नक्की वाचा : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना टाटा ग्रुपकडून प्रत्येकी १ कोटींची मदत;वसतिगृह देखील बांधणार 

कुठे व कधी पडणार पाऊस ? (Rain Alert)

राज्यात १३, १४, १५ जूनला दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकणात खूप पाऊस पडणार आहे. हा पाऊस पडत असताना १३,१४ जूनला विदर्भात देखील देखील पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ १२, १३, १४ जूनला देखील पाऊस पडणार आहे. या पावसामध्ये विजा कडाडण्याचं प्रमाण जास्त असून यामध्ये वारे देखील खूप आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी. वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने झाडाखाली आपले जनावर बांधू नयेत, वाऱ्यामुळे झाडे पडण्याची भीती आहे, असे पंजाबराव डख म्हणाले.  

अवश्य वाचा :  ‘ऊत’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर;अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते चित्रपटाचा पोस्टर अनावरण 

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Rain Alert)

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, नगर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. १३ जून ते १८ जून च्या दरम्यान लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर, जालना तर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगुळा तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात अधिक पाऊस पडणार आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.