Rain Alert:विदर्भात तीन दिवस पाऊस बरसणार;हवामान विभागाचा अंदाज 

0
Rain Alert:विदर्भात तीन दिवस पाऊस बरसणार;हवामान विभागाचा अंदाज 
Rain Alert:विदर्भात तीन दिवस पाऊस बरसणार;हवामान विभागाचा अंदाज 

Rain Alert : राज्यात उन्हाच्या झाला लागत असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट (Unseasonal Rain) निर्माण झाले आहे. आगामी तीन दिवस विदर्भात (Vidarbha Rain) पावसाचा ‘यलो अलर्ट’(Yellow Alert) देण्यात आला आहे. विदर्भात ११, १२ व १३ तारखेलाही पाऊस बरसणार आहे. राज्यातील इतर भागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असणार आहे. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नक्की वाचा : अखेर अमेरिकेकडून चीनवर १०४ टक्के टॅरिफ दर लागू!  

‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पडणार पाऊस (Rain Alert)

गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे येथील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की,आता पुढील २-३ दिवस उष्णतेची लाट विदर्भात कमी होणार आहे. पुढील ७२ तासांत अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरात दुपारी अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. चार दिवसांच्या उष्णतेच्या झळांनंतर नाशिकमध्ये आजपासून तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर ४१ अंशांवर गेलेला पारा आता दररोज एक अंशाने कमी होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार  

पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी  (Rain Alert)

हवामान खात्याचा अंदाज आहे की, पुढील २४ ते ४८ तासांत हवामानातील बदल सुरूच राहणार आहे.अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार आणि शनिवारी पंजाबमध्ये जोरदार वारे आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here