Weather Update:देशात पावसाचा मुक्काम वाढला,सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पडणार पाऊस

0
Weather Update:देशात पावसाचा मुक्काम वाढला, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पडणार पाऊस
Weather Update:देशात पावसाचा मुक्काम वाढला, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पडणार पाऊस

Weather Update: देशातील बहुतांश भागात यंदा पावसाने चांगली हजेरी (Heavy Rain) लावली आहे. मात्र अतिरिक्त पावसाने काही ठिकाणी जनजवीन विस्कळीत देखील झालं आहे. चांगल्या पावसामुळं नदी नाले धरणांच्या (Dam) पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ला’ निनाच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा (Monsoon) मुक्काम देशात वाढणार आहे. म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

ला निना’च्या प्रभावामुळे जोरदार पावसाची शक्यता (Weather Update)

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.  त्यामुळं सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. देशातील जवळफास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते.

राज्यातील ‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट जारी (Weather Update)

गेल्या काही दिवसापासून राज्यातील  बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज अहमदनगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं अवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

*पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम*

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळं सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा ७ टक्के पाऊस अधिक झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here