Pune Rain Update:पुण्यात पुन्हा पावसाची संततधार;हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

मागील काही दिवसांपूर्वी पुण्याला पावसाने चांगलेच झोडपले होते.आता पुन्हा पुण्यात संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

0
Pune Rain Update: पुण्यात पुन्हा पावसाची संततधार;हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
Pune Rain Update: पुण्यात पुन्हा पावसाची संततधार;हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Pune Rain Update : मागील काही दिवसांपूर्वी पुण्याला (Pune Rain) पावसाने चांगलेच झोडपले होते.आता पुन्हा पुण्यात संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. राज्यात मोसमी पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज पुण्याच्या वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यासह विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून घाटमाथ्यावर मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Pune Rain Update)

किनारपट्टीवरील तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टी सह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून उत्तर विदर्भामध्ये, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अवश्य वाचा : प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Pune Rain Update)

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे  विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणात सध्या पाणीसाठा ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या धरणामध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात चार ही धरणात ७९. ६६ टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी याच काळात चारही धरणातील पाणीसाठा हा ८९.८७ टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here