Rain in November : भारतात १२ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह देशात सुद्धा पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

0

नगर : देशभरात सध्या थंडीची (Cold) चाहूल लागली आहे. रात्री तर थंडी जाणवतेच मात्र दिवसाही कधी कधी थंडी जाणवत आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता (Chance of rain) वर्तवली आहे. राज्यासह देशात सुद्धा पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

नक्की पहा : भारतीय महिला हॉकी संघांची कमाल ; एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी  

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राज्यात काही भागांत जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज सहा नोव्हेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना सुरक्षितेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

अवश्य वाचा :  बाईपण जपणारं ‘झिम्मा २’ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ५नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.