Raj Thackeray : सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळवला जातोय : राज ठाकरे

सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळवला जातोय : राज ठाकरे

0
Raj Thackeray

Raj Thackeray : नगर : राजकीय पक्ष उभा करणं आणि चालवणं याला हिंमत लागते. आमच्या पक्ष स्थापनेच्या दहा वर्ष आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) स्थापन झाला. पण तो पक्ष नसून जिंकून येणाऱ्या आमदारांची मोळी होती. महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर तो पहिला म्हणजे जनसंघ, शिवसेना (Shiv Sena) आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हे पक्ष आहेत. मनसे पक्षात असलेले ९० टक्के कार्यकर्ते कोणत्याही पक्षात नव्हते. सामान्य लोकांना घेऊन आम्ही पक्ष उभा केला, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. मनसेच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्ताने नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

हे देखील वाचा : महायुती सरकारमुळेच खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला: राधाकृष्ण विखे पाटील

माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर (Raj Thackeray)

मागच्या अठरा वर्षात मी अनेक चढ-उतार पाहिले. यात अनेक उतारच जास्त होते. या उतारात माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले. एक दिवस पक्षाला यश मिळलेच आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना यश मिळवून देणारच, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यश मिळविण्यासाठी संयम ठेवा. मला माझ्या कडेवरती माझी मुलं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळवला जातोय. तसलं सुख मला नको. माझ्यात ताकद आहे, असे सांगून राज ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.

Raj Thackeray

नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार

अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक का नाही झाले? (Raj Thackeray)

मनसेच्या विरोधात पक्ष राजकीय पक्षच नाहीत तर माध्यमातील काही मंडळी आहेत. मनसे विषयाची सुरुवात करतो आणि शेवट करत नाही, असा आरोप आमच्यावर केला गेला. पण असे एकही आंदोलन नाही, जे आम्ही अर्थवट सोडलं. माध्यमं बाकी पक्षांना असे प्रश्न विचारत नाहीत. मग आता आम्ही त्या पक्षांना प्रश्न विचारतो. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का नाही झाले? पंतप्रधान मोदींनी येऊन फुलं वाहिली होती, त्याचं पुढं काय झालं? मनसेने जी आंदोलनं हाती घेतली, त्याचा शेवट केला.

Raj Thackeray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here