Raj Thackeray : नगर : शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हाती शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही. इतकंच नाही तर, राज ठाकरे जर महायुतीत येऊन जर त्यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर त्याला आपला विरोध असल्याचे एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय.
हे देखील वाचा: क्रूरतेचा कळस; दारुड्या नवऱ्याने पत्नीसह दाेन मुलींना जिवंत जाळले
राज ठाकरे यांच्या नावाचा विरोध
राज ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचं नेतृत्व जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशा शब्दात शहाजी बापू पाटील कडाडल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाही तर त्यांनी थेट राज ठाकरे यांच्या नावाचा विरोध केलाय.
नक्की वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले
राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट (Raj Thackeray)
केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली, यानंतर मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांच्या हाती द्यावं, अशी खलबतं या बैठकीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाल्याची माहिती मिळतेय. मात्र अशी आमची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झाली नाही, पण मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भात महायुतीत चर्चा झाल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.