Raj Thackeray : ‘वाघाची शेळी झाली’; माेदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका

Raj Thackeray : 'वाघाची शेळी झाली'; माेदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका

0
Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray : नगर : ”वाघाची शेळी झाली. शेळी गवत खाईल, असे राज ठाकरे यांचे भाजपमध्ये (BJP) जाऊन होऊ नये. राज ठाकरे (Raj Thackeray) या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात घातले का? राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही, अशी टीका काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.

Raj Thackeray
Raj Thackeray

हे देखील वाचा: मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पारनेरमध्ये भेटीचा धडाका; समाजसेवक अण्णा हजारेंची घेतली भेट

मनसेचा गुढीपाडवा मेळावा

शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया दिली.

Raj Thackeray

नक्की वाचा: नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात;उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक

वडेट्टीवार म्हणाले (Raj Thackeray)

”राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले, त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते.” असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here