Raj Thackeray : मनसेने रणसिंग फुंकले; स्वबळावर लढवणार २५० जागा

Raj Thackeray : मनसेने रणसिंग फुंकले; स्वबळावर लढवणार २५० जागा

0
Raj Thackeray : मनसेने रणसिंग फुंकले; स्वबळावर लढवणार २५० जागा
Raj Thackeray : मनसेने रणसिंग फुंकले; स्वबळावर लढवणार २५० जागा

Raj Thackeray : नगर : येणाऱ्या आगामी महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणूकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रणशिंग फुंकले आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मनसे २२५ ते २५० जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे (MNS) पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच, हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.

नक्की वाचा: खासदार लंकेंनी मांडला एलसीबीच्या भ्रष्टाचाराचा अर्थसंकल्प

लाडकी बहीण-भाऊवर भाष्य

लाडकी भाऊ आणि बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. माझी सर्वांना विनंती आहे, जिथे पूर आलाय तिथे लोकांना मदत करा. मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते आपलं निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत, असं राज ठाकरे म्हणाले.

अवश्य वाचा: पुण्यात मुसळधार पाऊस;अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मला कळेना कोण कुठला आमदार आहे (Raj Thackeray)

मी काल आढावा घेत होतो. मला कळेना कोण कुठला आमदार आहे. पुढे राजकीय घमासान होईल, इतकं होईल की ना भूतो न भविष्य असेल. मला कळलं आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो. त्यांचंच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Raj Thackeray : मनसेने रणसिंग फुंकले; स्वबळावर लढवणार २५० जागा
Raj Thackeray : मनसेने रणसिंग फुंकले; स्वबळावर लढवणार २५० जागा

सर्व्हे झाला, किती जागा लढणार?
आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला, तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल. कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, पैसे काढणाऱ्यांना तिकीट नाही. जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here