Raj Thackeray : अहिल्यागर : महाराष्ट्र राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, मराठी (Marathi) आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील (English Medium Schools) पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा (Hindi Language) शिकवली जाईल. यावर मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का ? -विजय वडेट्टीवार
हिंदी भाषेच्या सक्तीमुळे या शैक्षणिक धोरणाबाबत वादंग
जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. हिंदी भाषेच्या सक्तीमुळे या शैक्षणिक धोरणाबाबत वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : देवमाणूस मध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!
राज ठाकरे यांचा ट्विटरवर पोस्ट करत इशारा (Raj Thackeray)
याविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत इशारा दिला आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.