Raj Thackeray:’आम्ही एकत्र येणं कठीण नाही’;उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर 

0
Raj Thackeray:'आम्ही एकत्र येणं कठीण नाही';उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर 
Raj Thackeray:'आम्ही एकत्र येणं कठीण नाही';उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर 

नगर : आमच्यातील वाद, भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत.त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे.या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं,हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Majarekar) यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) युती करण्याच्या प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे. या विधानाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

नक्की वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या पी.एफ.गुंतवणुकीवरील १०० कोटींचे व्याज बुडीत  

राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत (Raj Thackeray)

महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का ? असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद, भांडण क्षुल्लक असल्याचं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं. त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

अवश्य वाचा : ‘एप्रिल मे ९९’मध्ये ‘जाई’ची एंट्री;यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय  

‘लार्जर पिक्चर बघणं गरजेचं'(Raj Thackeray)

महेश मांजरेकर यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं की, एकत्र येणं आणि एकत्र राहाणं,यात काही मला कठीण गोष्ट आहे,असं वाटत नाही. मात्र विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे,असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा,असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here