Raj Thackeray: राज ठाकरेंचा ‘सत्याचा मोर्चा’ नेमका कशासाठी ?

0
Raj Thackeray: राज ठाकरेंचा 'सत्याचा मोर्चा' नेमका कशासाठी ?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा 'सत्याचा मोर्चा' नेमका कशासाठी ?

नगर : राज्याच्या राजकारणात वेगवगेळे विषय चर्चेत असताना आता मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आज एल्गार पुकारणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसे (Manse)आज मुंबईत आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे.‘सत्याचा मोर्चा'(Satyacha Morcha) असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असतील. निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

नक्की वाचा:  “पंकजा मुंडेंना गृहमंत्री तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”  

सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंची मनसेही सहभागी (Raj Thackeray)

महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंची मनसेही सहभागी आहे. मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून राज ठाकरेंनी नुकताच रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेत मतदार यंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशनही केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज स्वतः मोर्चात चालणार आहेत. दादरहून सीएसएमटीकडे ते लोकलने प्रवास करणार आहेत. तसंच मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं होतं.

अवश्य वाचा:  कपाळी कुंकू आणि दैवी तेज;’महाकाली’ची पहिली झलक प्रदर्शित   

मोर्चातल्या मागण्या नेमक्या काय ? (Raj Thackeray)


१. मतदार याद्या अद्ययावत करा

२. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा

३. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा

४. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.

 या मोर्चाआधी विरोधकांनी मोठी तयारी केली असून पोलीस बंदोबस्त, मार्ग, वेळ सगळं ठरलं होतं. पण शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं मोर्चा परवानगी शिवायचं निघणार असल्याची माहिती समोर आलीय. या मोर्चात अनेक दिग्गजांची भाषणे होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.