Raja Shivaji Movie : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish deshmukh) याचा बहुचर्चित सिनेमा राजा शिवाजी (Raja shivaji) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत असून आज स्वत: रितेश देशमुखने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख (Release Date Announced) जाहीर केली आहे.रितेशने या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून काही दिवसांपूर्वीच त्याचा शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) वेशभूषेतील लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता रितेशने या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे.
नक्की वाचा : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी!गणपतीला कोकणात समुद्रमार्गे जाता येणार
महाराष्ट्र दिनी सिनेमा प्रदर्शित (Raja Shivaji Movie)
१ मे २०२६ रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनीच ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ६ विविध भाषांमध्ये म्हणजेच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये राजा शिवाजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे देशभरातील विविध राज्यातील चाहत्यांना त्यांच्या भाषेत सिनेमाची कथा आणि गौरवशाली इतिहास पाहण्याचा आनंद मिळणार आहे. आत्तापर्यंत रितेश देशमुखच्या लूकचे दोन फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
अवश्य वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार;चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
रितेश देशमुखच्या पोस्टमध्ये नेमकं काय ?(Raja Shivaji Movie)
रितेश देशमुखने राजा शिवाजी या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. अभिनेता लिहितो की, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत… राजा शिवाजी!” हा ऐतिहासिक चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा ६ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. सिनेमाची पहिली झलक पाहताच नेटकऱ्यांनी रितेशवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
चित्रपटात कोण झळकणार ?(Raja Shivaji Movie)
रितेश देशमुखने या पोस्टसह सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांची नावंही जाहीर केली आहेत. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय रितेशची पत्नी जिनिलीया देशमुख देखील या सिनेमात झळकणार आहे.