Raja Yoga : राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी

Raja Yoga : राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी

0
Raja Yoga : राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी
Raja Yoga : राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी

Raja Yoga : पारनेर :राजयोगाच्या (Raja Yoga) नियमित अभ्यासाने मानवी जीवनात सकारात्मक (Positive) बदल घडतात. यामुळे केवळ वैयक्तिक जीवनच नाही, तर जगाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो आणि जीवनात शांती व आनंद निर्माण होतो,” असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी साधना दिदी (Brahma Kumari Sadhana Didi) यांनी केले.

नक्की वाचा: शिर्डीत योग महोत्सव उत्साहात

शिवबाबांचे ९० वे अवतरण सोहळा भक्तीमय वातावरणात 

सुपा येथील ब्रह्मकुमारी गीता पाठशाळेत आयोजित महाशिवरात्री उत्सव आणि शिवबाबाचे ९० वे अवतरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. हा सोहळा अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पारनेर सेंटरच्या संचालिका साधना दिदी यांच्या हस्ते ‘मुरली’ कथनाने झाली. यानंतर, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले आणि त्यानंतर ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी वातावरणात शिवभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.

अवश्य वाचा: पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास होणार कारवाई

सुपा परिसरात आध्यात्मिक चैतन्याचे वातावरण (Raja Yoga)

याप्रसंगी सुपा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर मैड, देवराम भाई ढोले, प्रतिमा माताजी, सुमन ढोले, दिलीप थोरे, लक्ष्मण गवळी, मीना मेमाणे, रामदास भाई, राम भाई,पार्वती माता, सुषमा माता, कदम भाई, मोकाते भाई यांच्यासह परिसरातील अनेक ब्रह्मकुमारी अनुयायी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्यामुळे सुपा परिसरात आध्यात्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.