IPL 2024 : आयपीएलच्या रणसंग्रामात राजस्थान व दिल्ली आमने सामने

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. दिल्लीचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला होता.

0
IPL 2024
IPL 2024

नगर : आयपीएल २०२४ मध्ये आज (ता.२८) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. त्यामुळे दिल्ली संघाचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी दिल्लीच्या फलंदाजांना आपली कामगिरी दाखवावी लागेल. यासोबत सर्वांचे लक्ष कर्णधार ऋषभ पंतकडे लागले आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वगुणांचा कस या सामन्यात लागणार आहे.

नक्की वाचा : आयपीएलच्या मैदानात हैदराबादची सरशी;मुंबईचा सलग दुसरा पराभ

भीषण अपघातातून सावरत ४५३ दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या रिषभ पंतला आयपीएलच्या सलामीच्या लढतीत मोठा प्रभाव टाकता आला नाही. दिल्ली कॅपिटल्सला  पंजाब किंग्ज कडून हार पत्करावी लागली. या पराभवाला मागे टाकत आता दिल्लीचा संघ आज राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे. संजू सॅमसन च्या नेतृत्वात राजस्थानच्या संघाने सलामीच्या लढतीत लखनौ सुपर जायंटस् संघावर २० धावांनी विजय मिळवत दमदार सुरुवात केली. आता मात्र राजस्थानला रोखण्याचे काम दिल्लीला करावे लागणार आहे.

अवश्य वाचा : मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत आनंदऋषीजी म. सा.; आचार्यांच्या अभिवादनासाठी देशभरातील भाविक नगरमध्ये

अक्षर पटेल आणि कुलदीप कडून अपेक्षा (IPL 2024)

दिल्लीचा गोलंदाजी विभाग कमकुवत आहे.त्यातच इशांत शर्मा ला दुखापत झाली असून खलील अहमद याच्या गोलंदाजीवर पहिल्या लढतीत आक्रमण करण्यात आले. मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात गोलंदाजीत तो धमक दाखवेलच असे नाही. त्यामुळे अक्षर पटेल व कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा आहेत.

संजू कडून चांगल्या कामगिरीची आशा (IPL 2024)

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन कडून आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींमध्ये नेहमीच चांगले प्रदर्शन करण्यात येते. मात्र आयपीएलचा टप्पा पुढे सरकतो तेव्हा त्याला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता येत नाही. यंदाच्या मोसमात त्याला या कमकुवत बाबींवर लक्ष द्यावे लागणार आहे. यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल यांच्या समावेशामुळे राजस्थानची फलंदाजी भक्कम होते. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांसमोर कडवे आव्हान असणार आहे.

राजस्थानचा गोलंदाजी विभाग अव्वल दर्जाचा आहे. या संघात ट्रेंट बोल्ट, आवेश खान व संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांसोबत रवीचंद्रन अश्‍विन व युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. राजस्थानच्या पहिल्या विजयात गोलंदाजांचे योगदानही महत्त्वाचे होते. त्यामुळे राजस्थानला कमी लेखून चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here