RCB vs RR : राजस्थान रॉयल्सने बंगळुरुला मात देत क्वालिफायरमध्ये केला प्रवेश

राजस्थान रॉयल्सने या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला आहे.

0
RCB vs RR
RCB vs RR

नगर : आयपीएल २०२४ (IPL 2024) च्या रणसंग्रामामध्ये एलिमिनेटरची लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडली. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) पराभूत करत मोठी कामगिरी केली.

नक्की वाचा : पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!

क्वालिफायर-२ मध्ये राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (RCB vs RR)

राजस्थान रॉयल्सने या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला आहे. आता २४ मे रोजी क्वालिफायर-२ मध्ये राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे, हा सामना चेन्नईमध्ये पार पडणार आहे. या लढतीमधील विजेता संघ अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स विरोधात लढणार आहे.

अहमदाबादमध्ये राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात बंगळुरूने २० षटकांत आठ विकेट गमावत १७२ धावा केल्या. राजस्थानने १९ षटकांत ६ गडी राखून लक्ष्य गाठले. रोव्हमन पॉवेल ने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ४५ धावा केल्या. रियान पराग ३६ धावा करून बाद झाला तर शिमरॉन हेटमायर २६ धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने २ बळी घेतले. कॅमेरून ग्रीन, कर्ण शर्मा आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर एक फलंदाज यामध्ये धावबाद झाला.

अवश्य वाचा : अभिनेता विक्रांत मेस्सीच्या ‘ब्लॅकआऊट’ चा टिझर प्रदर्शित  

विराट कोहलीच्या आयपीएलमध्ये आठ हजार धावा पूर्ण (RCB vs RR)

आरसीबीकडून रजत पाटीदारने ३४ आणि विराट कोहलीने ३३ धावा केल्या. या सामन्यात कोहलीने इतिहास रचत आयपीएलमध्ये आठ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो लीगमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात आवेश खानने ३ बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनने २ विकेट घेतल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here