MI vs RR : राजस्थानचा सलग तिसरा विजय;मुंबईचा घरच्या मैदानावर नमवले 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने मुंबईचा ६ विकेट्सनी पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला.

0
MI vs RR
MI vs RR

नगर : आयपीएल २०२४ (IPL 2024) मधील १४ वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघामध्ये खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात राजस्थानने मुंबईच्या संघाला मात देत हा सामना आपल्या नावावर केला. त्यामुळे मुंबईला सलग तिसऱ्यांदा हार स्वीकारावी लागली.

नक्की वाचा : नामदेव जाधवांना छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टांत

राजस्थानने केला मुंबईचा ६ विकेट्सनी पराभव (MI vs RR )

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने मुंबईचा ६ विकेट्सनी पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला. त्याचबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राजस्थानला १२६ धावांचे लक्ष्य दिले होते, जे राजस्थानने रियान परागच्या अर्धशतकाच्या जोरावर १५.३ षटकांत सहज पार केले. मुंबईच्या फलंदाजांना या सामन्यात चांगली खेळी करता आली नाही. इतकंच काय तर आघाडीचे तीन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही.

अवश्य वाचा : मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी (MI vs RR )

रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस हे शून्यावर बाद झाले. तर इशान किशनही काही खास करू शकला नाही. अवघ्या १६ धावा करून तो बाद झाला. तर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली. पण संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाऊ शकले नाहीत. हार्दिक पांड्याने ३४, तर तिलक वर्माने ३२ धावा केल्या. टिम डेविड १७, पियुष चावला ३, गेराल्ड कोएत्झी ४धावा करून तंबूत परतले. दुसरीकडे, राजस्थान कडून रियान परागने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी केली. तर मुंबईच्या आकाश मढवाल आणि क्वेना मफाका वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. जसप्रीत बुमराहने ४ षटकं टाकली मात्र त्यालाही यश मिळालं नाही. राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्सने अव्वल स्थान गाठलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here