Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण

Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण

0
Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण
Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण

Rajendra Ghodke : नगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित (आरोग्यवारी 2025) स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. अहिल्यानगरच्या राजेंद्र सूर्यभान घोडके (Rajendra Ghodke) यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करीत जिल्ह्यात पहिल्यांदा हा बहुमान मिळविला. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) पुणे ते बारामती अशी १०० किलोमीटर अंतर असलेली ही स्पर्धा होती. घोडके यांनी या स्पर्धेत खुल्या गटात सहभाग घेतला होता. या गटात ८५ स्पर्धक सहभागी होते.

Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण
Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण

अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

विविध स्पर्धांत मिळविले आहे यश

स्पर्धे दरम्यान जेजुरी, मोरगाव, दिवे घाटातील चढ-उतार व कशाचीच पर्वा न करता राजेंद्र घोडके यांनी वरील स्पर्धा यशस्वीतेने पूर्ण केली. घोडके अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्कृष्ट धावपटू आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई टाटा मॅरेथॉन (४२ किलोमीटर) दोन वेळा, लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन (५० किलोमीटर) दोन वेळा, सातारा हिल मॅरेथॉन (२१ किलोमीटर) दोन वेळा, खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन (५६ किलोमीटर), गणपतीपुळे (५६ किलोमीटर), कास अल्ट्रा मॅरेथॉन (६५ किलोमीटर), बारामती पावर मॅरेथॉन (४२ किलोमीटर), आपले पुणे (३५ किलोमीटर व ४२ किलोमीटर), अहिल्यानगर ते पंढरपूर रिले रन वारी २०२५, अहिल्यानगर ते पंढरपूर सायकल वारी २०२४, हिस्टॉरिकल मॅरेथॉन व नगर रायझिंग मॅरेथॉन २१ किलोमीटर अशा विविध स्पर्धांत यश मिळविले आहे.

Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण
Rajendra Ghodke : अहिल्यानगरच्या राजेंद्र घोडके यांनी १०० किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली पूर्ण

नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल

डायबिटीस पेशंट व इतरांना प्रेरणादायी (Rajendra Ghodke)

घोडके रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. डायबिटीस असून देखील त्यांनी हे यश मिळवून डायबिटीस पेशंट व इतरांना प्रेरणादायी ठरत आहेत. अहिल्यानगर तालुक्यातील घोसपुरी येथे ते वास्तव्यास आहेत. त्यांना हरिष काबरा, अनुपम संकलेचा, ललित लुणिया यांचे विशेष मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या यशात कुटुंबीय, फिटनेस व मित्रपरिवाराचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.