Rajendra Nagawade : नगर : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरणाऱ्यांना जनता थारा देणार नाही, अशा शब्दात राहुल जगताप (Rahul Jagtap) यांच्यावर सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे (Shivajirao Nagawade Cooperative Sugar Factory) अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagawade) यांनी जोरदार टीका केली. ज्यांनी शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे उसाचे पैसे दिले नाही म्हणून ३० गुन्हे दाखल झाले, शेतकऱ्यांचे वाटोळे केले, ज्यांनी सरकारचा विकासासाठी आलेल्या पैशातून ४० टक्के कमिशन घेतल्याने कामाचा दर्जा घसरला हे ज्यांचं कर्तृत्व. ते आमदार (MLA) म्हणून काय विकास करणार? असा सवाल यावेळी त्यांनी श्रीगोंदा येथे माध्यमांशी बोलताना केला.
नक्की वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?
नागवडे म्हणाले,
निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, सहकारात आमचा कारभार नागवडे कारखाना ५० वर्षे सलग गळीत हंगाम करत आहे. शिवाय उमेदवार अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा सहकारी बँक येथे चांगले काम केले. तुलनेत विरोधी उमेदवार यांचे साखर क्षेत्रात आणि तालुक्याच्या विकासात काय दिवे लावले ते सर्वांना माहीत आहे, असे सांगून भाजप उमेदवाराने तर आईला मिळालेली उमेदवारी बदलण्यासाठी शेवटी उमेदवारी मिळाली नाही, तर पुण्याला निघून जाईल असे वेठीस धरले. ते पुण्याला जाणार होते त्यांचे स्वप्न जनताच २० तारखेला पूर्ण करणार असून जनता मुंबईला नाही तर पुण्याला नक्की पाठवणार असे सांगितले.
अवश्य वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार
अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यावर टीका (Rajendra Nagawade)
अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यावर टीका करताना राजेंद्र नागवडे म्हणाले, २०१४ साली आम्ही त्यांना आमदार बनवण्यात पुढाकार घेतला २०१९ मध्ये त्यांनी उमेदवारी नाकारली. कारण दिले की, कुकडी सहकारी साखर कारखान्याची घडी बसवायची, मात्र, प्रत्यक्षात आज कुकडी कारखाना शेतकऱ्यांचे बिल देऊ शकत नाही. शेतकरी पेमेंटसाठी चकरा मारत आहे, अशा व्यक्तीला खासदार शरद पवार कशी उमेदवार देणार? कारण २०१४ साली याच मुद्द्यावर लोकांनी पाचपुते यांना नाकारले होते. हे शरद पवार यांना माहीत आहे, अशी टीका करताना नागवडे म्हणाले, जगताप हे स्व.शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरतात त्यांनी नागवडे यांचा कारखाना कारभार पहावा. ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे कधीच थकवले नाही, ज्यांच्या कुटुंबातील कोणीही जगताप यांच्या बरोबर नाही. त्यांचा फोटो वापरण्याचा जगताप यांना अधिकार नाही. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांना आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे समर्थन असताना जगताप यांनी खासदार शरद पवार आणि खासदार राहुल गांधी यांचा फोटो वापरून दिशाभूल चालवली आहे. मात्र, जनता थारा देणार नाही, असे त्यांनी सांगितले.