Rajinikanth : रजनीकांतचा ‘लाल सलाम’ चित्रपटातील फर्स्ट लूक आऊट

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांचा ७३ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आगामी 'लाल सलाम' या सिनेमाचा प्रोमो आऊट झाला आहे.

0
रजनीकांतचा 'लाल सलाम' चित्रपटातील फर्स्ट लूक आऊट

Lal Salaam: नगर : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी त्यांचा ७३ वा वाढदिवस (Rajinikanth Birthday) नुकताच साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आगामी ‘लाल सलाम’ (Lal Salaam) या सिनेमाचा प्रोमो आऊट झाला आहे. या सिनेमातील रजनीकांत यांच्या ‘मोईद्दीन भाई’च्या स्वॅगने चाहत्यांना वेड लावलं आहे. जेलर’ (Jailer) नंतर रजनीकांतचे चाहते आता ‘लाल सलाम’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

नक्की वाचा : ‘पापलेट’ माश्याला आता जीआय मानांकन मिळणार

रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लाल सलाम’मधील त्यांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. ‘लाल सलाम’ हा तामिळ भाषेतील स्पोर्ट्स ड्रामा आहे. या सिनेमात रजनीकांत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. रजनीकांतसह या सिनेमात विष्णु विशाल, विक्रांत, विग्नेश आणि जीविता हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाचं कथानक रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याने लिहिलं आहे. तसेच दिग्दर्शनाची धुराही तिनेच सांभाळली आहे.

अवश्य वाचा : लाचखोर महिला तलाठीसह खासगी मदतनीस ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

‘लाल सलाम’ या सिनेमाची घोषणा २०२२ मध्ये झाली होती. तर २०२३ मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये या सिनेमाचं शूटिंग संपले. हा सिनेमा २०२४ मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. रजनीकांत यांनी आपला ७३ वा वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. रजनीकांत यांच्या कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवस घरातच जल्लोषात साजरा केला.आता प्रेक्षकांना’लाल सलाम’ मधील अॅक्शचा तडका पाहण्याची उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here