Rajkummar Rao: राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ मधील फर्स्ट लूक प्रदर्शित; साकारणार उद्योगपती श्रीकांत बोल्लाची भूमिका

राजकुमार रावचा श्रीकांत हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. राजकुमार रावशिवाय या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहेत.

0
Rajkumar Rao
Rajkumar Rao

नगर : बॉलिवूड (Bollywood) मधील चतुरस्त्र अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) त्याच्या ‘श्रीकांत’ (Shrikanth Movie) या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आता या चित्रपटातील राजकुमार रावचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट (Rajkummar Rao)

xr:d:DAFvzVEvC2U:1507,j:6419179284349767489,t:24040512

राजकुमार रावचा हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. राजकुमार रावशिवाय या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. राजकुमार हा श्रीकांत चित्रपटामध्ये प्रसिद्ध उद्योगपती श्रीकांत बोला यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक निर्मात्यांकडून आज शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राजकुमार राव रस्त्यावर पळताना दिसत आहे. या चित्रपटाचे टायटल इंग्रजी आणि ब्रेल लिपीमध्ये लिहिण्यात आले आहे.

नक्की वाचा : ‘महापरिनिर्वाण चित्रपटातील ‘जय भीम’गाणं प्रदर्शित  

तुषार हिरानंदानी यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Rajkummar Rao)

टी सिरीज आणि Chack N Cheese Films ने राजकुमार रावच्या ‘श्रीकांत – आ रहा है सबकी आँखे खोलने’ चा फर्स्ट लूक आउट केला आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये ‘पापा कहते हैं’ या गाण्याचे संगीत ऐकायला मिळत आहे. श्रीकांत चित्रपटाला आधी ‘श्री’ असे नाव देण्यात आले होते. ‘श्रीकांत-आ रहा है सबकी आँखे खोलने’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी हे या चित्रपटाचे निर्माता आहेत.

अवश्य वाचा : राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ‘या’ दिवशी;मुंबईतील २८ केंद्रांवर पार पडणार परीक्षा

श्रीकांत बोल्ला हे अंध असताना देखील अमेरिकेत शिकणारे पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी होते. ते एक यशस्वी व्यावसायिक बनून दाखवतात. त्यांनी अंध असूनही आपली स्वप्ने पूर्ण केली आणि बोलंट इंडस्ट्रीज नावाची कंपनी स्थापन केली. श्रीकांत जन्मापासूनच अंध होते आणि त्याचे कुटुंब प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होते. शेतकरी कुटुंबातून आले असताना देखील श्रीकांत यांनी अथक परिश्रम करत प्रसिद्ध व्यावसायिक बनून दाखवले. त्यांच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट १० मे २०२४ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here