Rajya Sabha Election:महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर;मतदान कधी ?

0
Rajya Sabha Election:महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर; मतदान कधी ?
Rajya Sabha Election:महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर; मतदान कधी ?

नगर: भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राज्यसभेच्या (Rajya Sabha Election)रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर (Announced) केला आहे. १० राज्यांमधील ३७ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२६ मध्ये संपत असल्याने ही निवडणूक घेतली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ महत्त्वाच्या जागांचा (7 seats in Maharashtra) समावेश आहे.

नक्की वाचा: राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी तर ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये;राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कसा असेल निवडणूक कार्यक्रम ? (Rajya Sabha Election)

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २६ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल. निवडणूक बिनविरोध न झाल्यास मतदानानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल स्पष्ट होतील.

अवश्य वाचा: १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली! 

महाराष्ट्रातील कोणाचा कार्यकाळ संपणार ? (Rajya Sabha Election)

एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सात मोठ्या नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार फौजिया खान (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), खासदार प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), खासदार रजनी पाटील (काँग्रेस), धैर्यशील पाटील (भाजप), भागवत कराड (भाजप) आणि रामदास आठवले या खासदारांचा समावेश आहे.

कुठल्या राज्यातील किती जागा? (Rajya Sabha Election)

देशभरातील ३७ जागांसाठी ही राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र (७), ओडिशा (४), तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), आसाम (३), बिहार (५), छत्तीसगढ (२), हरयाणा (२), हिमाचल प्रदेश (१) आणि तेलंगणा (२) या जागांचा समावेश आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा ? (Rajya Sabha Election)

राज्यातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता महायुतीकडे ७ पैकी ६ जागा जाण्याची शक्यता आहे. तर, एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. राज्यसभेच्या एका जागेसाठी ३७.५ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने या निवडणुकीत सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपचं पारडं जड मानलं जात आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपला चार जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा आणि शिंदेंच्या शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागू शकतं.