Raksha Bandhan : बहीण-भावाचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी खास ‘राखी पाकीट’ याेजना; टपाल खात्याकडून विशेष सुविधा उपलब्ध

Raksha Bandhan : बहीण-भावाचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी खास ‘राखी पाकीट’ याेजना; टपाल खात्याकडून विशेष सुविधा उपलब्ध

0

Raksha Bandhan : नगर : भाऊ बहिणीच्या प्रेमांच प्रतीक असलेला सण रक्षाबंधन (Raksha Bandhan) काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवशी दूर राहणाऱ्या भावाला राखी (Rakhi) पाठवणाऱ्या बहिणीसाठी टपाल खात्याने (Postal Department) एक विशेष योजना तयार केली आहे. या याेजनेसाठी टपाल खात्याकडून एक विशेष राखी पाकिट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे बहिणींना भावांना राखी पाठवणे साेपे झाले आहे. या योजनेमधून भावा बहिणीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, हा टपाल खात्याचा एक प्रयत्न आहे.

अवश्य वाचा: महसूल प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कलात्मकतेने विशेष राखी पाकीट तयार

रक्षाबंधनासाठी टपाल खात्याने तयार केलेल्या कलात्मकतेने हे विशेष राखी पाकीट तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे पाकीट वाॅटरप्रूप असून त्यावर राखीचे चित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. टपाल खात्यात राखीच्या पाकिटांचे सहा प्रकार उपलब्ध केले आहे. कमीत कमी वेळात या पाकिटाच्या माध्यमातून राखी बहिणीकडून भावाकडे पोचावी व त्याद्वारे बहिणीचे प्रेमही भावाला मिळावे, असा टपाल खात्याचा प्रयत्न आहे.

नक्की वाचा: एलसीबी विरोधातील तक्रारींची १५ दिवसांत चौकशी; आश्वासनानंतर खासदार लंकेंचे उपोषण मागे

भाऊ बहिणीमधील पवित्र प्रेमाचा सण (Raksha Bandhan)

तरुणाई व लहान मुलामुलींना आवडेल अशा प्रकारे हे पाकीट तयार करण्यात आले आहे. हे पाकीट पावसाळी वातावरणात टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे. ”रक्षाबंधनाच्या निमित्ताने टपाल खात्याने भाऊ बहिणीमधील पवित्र प्रेमाचा सण अधिक चांगल्या प्रकारे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळेल,” असा विश्वास सहायक डाक अधीक्षक संदीप हदगल यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here