Raksha Bandhan : पारनेर : रक्षाबंधन (Raksha Bandhan) या सणाच्या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार (Tradition) राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. सैनिकही (Soldier) सीमेवर देशवासीयांचे दिवस रात्र रक्षण करत असतात. म्हणून सैनिकांच्या हाती रक्षाबंधनाचा धागा बांधून आपले रक्षण करण्याचे साकडेच जणू श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमेवर तैनात सैनिकांना घातले आहे.
नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर
१०० स्वनिर्मित राखी व सैनिकांसाठी शुभेच्छा संदेशपर
श्री ज्ञानेश्वर विद्यालय व श्री छत्रपती आजी-माजी सैनिक संघटना, रुई छत्रपती (ता. पारनेर) यांच्या संयुक्त विद्यमाने “एक धागा सैनिकांसाठी” हा उपक्रम नुकताच कारगिल दिन चे औचित्य साधून विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडला. याप्रसंगी पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळपास १०० स्वनिर्मित राखी व सैनिकांसाठी शुभेच्छा संदेशपर पत्र संकलन करण्यात आले. संकलन पेटी याच विद्यालयात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व भारतीय नौदलात सेवारत व रजेवर आलेले सैनिक लीडिंग सीमन / नाईक शेखर शिवदास साबळे यांच्याकडे सुपूर्द केले.
अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!
सर्व जवानांच्या मनगटात बांधण्यात आल्या राख्या (Raksha Bandhan)
साबळे यांनी राख्या संकलन केलेली पेटी आपल्या युनिटमध्ये आयएनएस डेगा येथे सुरक्षित घेऊन गेले. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कमान अधिकारी महोदय कमोडोर शिवाजी यादव यांनी सर्व सैनिकांच्या उपस्थितीत रक्षाबंधन पेटी उघडली. पेटीतील राख्या सर्वधर्म स्थलामध्ये धर्मगुरूंच्या हस्ते सर्व जवानांच्या मनगटात बांधण्यात आल्या व विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे सर्व सैनिकांना वाटण्यात आले. सर्व सैनिकांनी विद्यार्थ्यांकडून लिहिलेली पत्रे मनोभावे वाचली. जणू काही आपल्या कुटुंबातीलच सख्या बहीण भावांनीच त्यांच्यासाठी सीमेवर राख्या पाठवल्या आहेत.
यावेळी अनेकांनी आपल्या भावना सर्वांसमोर विशद केल्या तर काहींचे डोळे पान्हावले. कमान अधिकारी महोदयांनाही हा उपक्रम खूपच सुंदर व अभिमानास्पद असल्याचे सांगितले. सर्व जवानांनी परत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आभार पत्र लिहिण्याचे सुचवले. सैनिकांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली पत्रे लवकरच विद्यालयात पोहोचणार आहेत. या उपक्रमाचे सर्वच स्तरावर कौतुक होत असून सर्वच शाळांमधून असा स्तुत्य उपक्रम राबविला पाहिजे अशी परिसरात चर्चा होत आहे.