Raksha Khadse : सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा करावा : खडसे 

Raksha Khadse : सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा करावा : खडसे 

0
Shrigonda

Raksha Khadse : श्रीगोंदा : सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या व राबविल्या, आपण याचा सातत्याने पाठपुरावा करावा. श्रीगोंदा मतदारसंघात संघटना मजबूत आहे. आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांचे काम देखील उल्लेखनीय आहे. अती आत्मविश्वास नको तर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन काम करावे, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी श्रीगोंदा येथे भाजपच्या (BJP) श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly Constituency) आढावा बैठकीत बोलताना केले.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

खडसे म्हणाल्या

राज्यात आपल्याला पुन्हा सत्ता मिळवायची आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तळागाळापर्यंत पोहोचवून लोकसंपर्क वाढवला तर येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच घवघवीत यश मिळेल.

अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, (Raksha Khadse)

मतदारसंघात सर्व प्रश्न सोडवताना आपण सामाजिक बांधिलकीतून सर्व कामे केली आहेत.  लोकसभा निवडणुकीच्या वेळी वेगळी परिस्थिती होती, त्यामुळे मताधिक्य घटले. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रम पाचपुते व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे मतदार नक्कीच पुन्हा संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


विक्रम पाचपुते यांनी प्रास्ताविक करून केलेल्या कामांचा आढावा दिला. यावेळी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक शब्बीरभाई बेपारी व सहकाऱ्यांनी तसेच विविध गावातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभा पाचपुते, दिनूकाका पंधरकर, गणपत काकडे, पोपटराव खेतमाळीस, प्रतापसिंह पाचपुते, बाळासाहेब महाडिक ,संदीप नागवडे, बापू गोरे, पुरुषोत्तम लगड, मिलिंद दरेकर, धनराज कोथिंबिरे, मंगेश घोडके, शुभांगीताई सप्रे, देवयानी शिंदे, सुजाता खेडकर, विद्या शिंदे, उषाताई कर्डिले तसेच सर्व माजी नगरसेवक, भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.