नगर: आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे हल्ले घडून आणतात असा थेट आरोप (Blame) राम खाडे (Ram Khade) यांच्या पत्नीने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी (ता.२६) रात्री जीवघेणा हल्ला (Fatal Attack) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे (Tulasa Khade) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल सायंकाळी सात वाजता माझे त्यांच्यासोबत फोनवर बोलणं झाले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मला हल्ला झाला हे समजल्याचे तुळसा खाडे यांनी सांगितले.
नक्की वाचा: मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती
नेमकं काय म्हणाल्या तुळसा खाडे? (Ram Khade Attack)

तुळसा खाडे म्हणाल्या की, काल दुपारी अडीच वाजता ते घराबाहेर गेले होते. हल्ला झाला हे माहीत झाल्यावर मी खूप घाबरले होते. या आधी देखील त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. हल्ला करणारे १० ते १५ जण होते,अशी माहिती आम्हाला मिळाली होती. काल सायंकाळी सात वाजता माझे त्यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मला हल्ला झाल्याचं समजलं. जेवण करण्यासाठी ते त्या ठिकाणी थांबले होते. याचवेळी गाडीमागे लपलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. ते घोटाळे काढतात म्हणून त्यांच्यावर हल्ले होत आहेत असं तुळसा खाडे म्हणाल्या. राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. त्यांनी काही वार हातावर झेलले. परंतु, इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
अवश्य वाचा: ‘महावतार नरसिंह’ सिनेमाची ऑस्करसाठी एन्ट्री;’या’आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी होणार टक्कर
‘आरोपींना अटक करावी, मला न्याय द्यावा’ (Ram Khade Attack)
सोसायटी जमिनीबाबत त्यांच्यावर हल्ला झाला,अशी शंका उपस्थित करण्यात आली. इथून तिथून सरकार त्यांचं आहे म्हणून प्रकरण दाबले जाते. यापूर्वी आमची गाडी पेटवण्यात आली होती. आमच्या कुटुंबाने घराबाहेर पडायचं नाही का? आमची केवळ एकच मागणी आहे, आरोपींना अटक करावी, मला न्याय द्यावा, अशी मागणी तुळसा खाडे यांनी केली आहे. हे किती दिवस चालणार? दिल्लीपर्यंत त्यांचे सरकार असल्याने हे दाबले जात असल्याचे तुळसा खाडे म्हणाल्या.



