Ram Lalla Surya Tilak: अयोध्येत प्रभू श्रीरामांना सूर्य तिलक; भक्तांनी अनुभवला अद्भुत क्षण  

शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर उभ्या राहिलेल्या बालक रामांच्या भव्य मंदिरात पहिल्या राम नवमी निमित्त आज अयोध्येत प्रचंड उत्साहात सूर्याभिषेक सोहळा झाला.

0
Ram Lalla Surya Tilak
Ram Lalla Surya Tilak

नगर : देशभरात आज रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) राम मंदिरात देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पहिल्या राम नवमी निमित्त आज प्रभू श्रीरामांची विशेष पूजा करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यावेळी रामल्लाचे सूर्य तिलक (Surytilak) करण्यात आले. राम जन्माच्या पवित्र वेळेत आज (ता. १७) दुपारी १२ वाजता श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक करण्यात आला.

नक्की वाचा : अमिताभ बच्चन यांना यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

तंत्रज्ञानाच्या मदतीने रामलल्लाचा सूर्यकिरणांनी अभिषेक (Ram Lalla Surya Tilak)

खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळाच्या बरोबर मध्यभागी पडली होती. हा अनुपम्य सोहळा लाखो भाविकांना याची देही याची डोळा अनुभवण्यात आला. सुमारे ४ मिनिटे सूर्याची किरणे बालक राम मूर्तीच्या मस्तकावर पडत होती. रामायण कथांनुसार, जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. तेव्हा सूर्यदेवाने येऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. याच प्रसंगाची पुनरावृत्ती करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरात विशेष तयारी करण्यात आली होती. आज दुपारी १२ वाजता, भारतीय विज्ञान तंत्रज्ञान संस्थांनी तयार केलेल्या एका खास तंत्राच्या मदतीने सूर्याची किरणे रामलल्लांच्या मूर्तीवर प्रक्षेपित करण्यात आली.

अवश्य वाचा : श्रीरामपूर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने सूर्य तिलक (Ram Lalla Surya Tilak)

अयोध्येतील राम मंदिर हे तीन मजली आहे. यातील तळमजल्यावर असणाऱ्या गर्भगृहात बालक राम विराजमान आहेत. त्यामुळे याठिकाणी सूर्य किरणे पोहोचवणे हे एक आव्हान होते. यासाठी CSIR-CBRI रुडकी आणि बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सच्या मदतीने एक सेटअप तयार करण्यात आला. या आरशांच्या मदतीने मंदिरावर पडणारी सूर्याची किरणे ही आतल्या बाजूला वळविण्यात आली. गर्भगृहापर्यंत नेलेल्या सूर्य किरणांना लेन्सच्या मदतीने बालक रामांच्या कपाळावर फोकस करण्यात आले. यामुळे बालक रामांना ‘सूर्य-तिलक’ लावणे शक्य झाले आणि हा सूर्यकिरणाभिषेक संपन्न झाला. या तंत्राच्या वापरातून दरवर्षी हा सोहळा असाच करण्यात येणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here