काेड रेड
Ram Navami : नगर : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. १७) दुपारी नगर शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून श्रीराम नवमी (Ram Navami) उत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे या मिरवणुकीच्या कालावधीत शहरातील मिरवणूक मार्गावर नाे व्हेईकल झाेन (No Vehicle Zone) (वाहन विरहित क्षेत्र) दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत घाेषित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश पाेलीस (Police) अधीक्षक राकेश ओला यांनी काढले.
हे देखील वाचा: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप
पाेलीस प्रशासनाची करडी नजर
रामनवमीनिमित्त कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मिरवणूक मार्गावर ड्राेनद्वारे पाेलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. याबाबत पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. शहरासह जिल्हाभरात बुधवार (ता. १७) राेजी रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त हिंदू संघटनेकडून जाेरदार तयारी सुरू केली आहे.
नक्की वाचा : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार
असा असणार मिरवणूक मार्ग (Ram Navami)
दुसरीकडे पाेलीस प्रशासनानेही दक्षता म्हणून रामनवमीच्या मिरवणूक मार्गावर ड्राेनद्वारे बारकाईने पाहणी केली आहे. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चाैक-माळीवाडा-पंचपीर चावडी-बाॅम्बे बेकरी-चांद सुलतान हायस्कूल- माणिक चाैक- कापडबाजार- तेलीखुंट- चितळे रस्ता- चाैपाटी कारंजा मार्गे दिल्लीगेटपर्यंत जाणार आहे.