Ram Navami : श्रीरामपूर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

Ram Navami : श्रीरामपूर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

0
Ram Navami
Ram Navami : श्रीरामपूर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

Ram Navami : श्रीरामपूर : शहरातील राम मंदिर (Ram temple), काळाराम मंदिर व हनुमान मंदिरासह विविध मंदिरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते श्रीरामाच्या (Shri Ram) पाळण्याची दोरी ओढून राम जन्मोत्सवाचा (Ram Navami) सोहळा उत्साहात पार पडला. महसूल प्रशासनासह विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने येवून मंदिरावर झेंडे चढविले. आज (ता. १७) दुपारी मंदिरात रामजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. सकाळी अभिषेक, आरती तसेच कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सजविलेल्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. प्रवरा कालव्यानजिक शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली.

Ram Navami
Ram Navami : श्रीरामपूर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

हे देखील वाचा : मतदानावर बहिष्कार टाकू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आवाहन

झेंड्याची सवाद्य मिरवणूक

महसूल, शहर पोलीस ठाणे, गोंधवणी येथील महादेव मंदिर, तालुका पोलीस ठाणे, डावखर मित्रमंडळ, श्रीराम मंडळ आदींसह विविध मंडळांनी झेंड्याची सवाद्य मिरवणूक काढून मंदिरावर झेंडे चढविले. शहरात यात्रेनिमित्त मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. आजपासून तीन दिवस यात्रा चालणार आहे. गुरूवारी (ता. १८) सकाळी १० वाजता शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा राम मंदिरात (Ram Navami) विश्वस्तांच्या वतीने सत्कार करण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता शनिमहाराज रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १८) दुपारी तहसील कचेरीजवळ कुस्त्याचा हगामा आयोजित करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते : सुजय विखे

अनेक मान्यवरांची उपस्थिती (Ram Navami)

यावेळी आमदार लहू कानडे, अनुराधा आदिक, करण ससाणे, संजय फंड, आशिष धनवटे, वंदना मुरकुटे, रंजना पाटील, प्रांताधिकारी किरण सावंत व मनिषा सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे व राधिका वाघचौरे, सिद्धार्थ मुरकुटे, पोलीस उपअधीक्षक डाॅ.बसवराज शिवपूजे, सचिन गुजर, श्रीराम मंदिर ट्रस्टच्या प्रणिता गिरमे, सचिव दिनेश सूर्यवंशी, रौनक गिरमे, रमेश झिरंगे, अनिल गिरमे, वैशाली गिरमे, अशोक फोपळे, अमोल महाले, प्रतिक बोरावके, यात्रा कमिटीचे अध्यक्ष राम टेकावडे, सत्यनारायण उपाध्ये, सुरेश ओझा, बाबासाहेब लबडे, गौतम उपाध्ये, अशोक उपाध्ये, बन्सी फेरवाणी, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले आदी उपस्थित होते. यावेळी भाविकांना पंजेरीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

Ram Navami
Ram Navami : श्रीरामपूर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here