Ram Navami : कर्जत : अखंड हिंदू समाज (Hindu society) कर्जत तालुका आणि मृत्युंजय ग्रुप कर्जत यांच्यावतीने श्री रामनवमी (Ram Navami) जन्मोत्सव उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीराम यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू बांधवासह मुस्लिम बांधवांनी देखील उपस्थित राहत सामाजिक ऐक्याचे (Social unity) दर्शन दिले.
हे देखील वाचा: अयोध्येत प्रभू श्रीरामांना सूर्य तिलक; भक्तांनी अनुभवला अद्भुत क्षण
मुस्लिम समाजाच्यावतीने देखील पूजन
मुस्लिम समाजाच्यावतीने देखील प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी “जय श्रीराम” घोषणेने परिसर दुमदुमला होता. कर्जत शहर आणि तालुक्यात रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कर्जत शहरातील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात मृत्युंजय ग्रुप कर्जत यांच्यावतीने प्रभू श्रीराम यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय श्रीराम घोषणेने परिसर दणाणला होता.
नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते : सुजय विखे
भव्य-दिव्य शोभायात्रेचे आयोजन (Ram Navami)
यावेळी बारामती ऍग्रोच्या सुनंदा पवार, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, युवक काँग्रेसचे सचिन घुले, उद्योजक दीपक शिंदे, प्रा. शशिकांत पाटील, शरद पवार गटाचे प्रा. विशाल मेहेत्रे, देवा खरात, नितीन धांडे, महावीर बोरा, सोहन कदम, वैभव शहा, शरीफ पठाण, माजीद पठाण, नगरसेविका ज्योती शेळके, हर्षदा काळदाते, प्रतिभा भैलुमे, प्रीती जेवरे, पूजा मेहेत्रे यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. यावेळी मृत्युंजय समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिपक शहाणे यांनी सर्वांचे आभार मानले. सायंकाळी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.