Ram Navami : नगर : अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar City) रविवारी (ता. ६) काढण्यात आलेल्या रामनवमी (Ram Navami) उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण (Noise Pollution) केल्याच्या आरोपाखाली कोतवाली व तोफखाना पोलीस (Police) ठाण्यांत चार स्वतंत्र गुन्हे दाखल (Crime Filed) करण्यात आले आहेत.
नक्की वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस
डिजे साहित्य करण्यात आले जप्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत डीजे सिस्टीमवर कर्णकर्कश आवाजात गाणी लावण्यात आली. संबंधित मंडळांचे पदाधिकारी व डीजे मालक-चालकांविरूध्द पर्यावरण संरक्षण अधिनियम व ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. डिजे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
अवश्य वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार
दुपारी तीन वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत रामनवमी मिरवणूक (Ram Navami)
रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत रामनवमी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सकल हिंदू समाज, हिंदूराष्ट्र सेना, वास्तव कंपनी ग्रुप, श्रीराम सेना अशी चार मंडळे सहभागी झाली होती. या मंडळ पदाधिकारी व डीजे मालक-चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुभम मनोज कर्डिले (रा. शेरकर गल्ली, सर्जेपुरा), डीजे मालक महेश दत्तात्रय शिंदे (रा. पुणे), दिगंबर लक्ष्मण गेंटाल (रा. सावेडी), डीजे मालक वैभव विठ्ठल बोरकर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंडळ अध्यक्ष प्रतिक कांबळे (रा. बोल्हेगाव), डीजे मालक रितेश राजेश पाटील (रा. सांगली), मंडळ अध्यक्ष दीपक ज्ञानेश्वर नाटकर (रा. कजबे वस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) व डीजे मालक सुरज जयवंत घारे (रा. घारेवाडी, ता. कराड) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.