Ram Navami : नगर : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयातर्फे रविवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता रामनवमी (Ram Navami) निमित्त नेप्ती परिसरातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (Shri Gondavalekar Maharaj) उपासना संस्थान येथील थोरले श्रीराम मंदिर (Shri Ram Temple) येथे श्रीराम कथेवर आधारित गायन, वादन, नृत्य, नाट्य व काव्य या कलांचा एकत्रित असलेला ‘आज अयोध्या (Ayodhya) सजली’ हा अनोखा कलाविष्कार सादर केला गेला.
नक्की वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस
भक्तिमय श्रीराम कथेवर आधारित नृत्य नाटिकेचा आनंद
कार्यक्रमास सर्वांनी या भक्तिमय श्रीराम कथेवर आधारित नृत्य नाटिकेचा आनंद घेतला. सुरुवातीला डॉ. सी.बी.कुलकर्णी व डॉ. गौरी कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन झाले .त्यानंतर कार्यक्रमातील कलाकारांनी भगवान नटराजाला वंदन करून ‘हम कथा सुनाये राम सकल गुणधाम की’ या गाण्याने श्रीरामाच्या पुण्यकथेची मंगलमय वातावरण निर्मिती केली.
अवश्य वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार
सर्व उपस्थित भक्तिभावात राममय होऊन गेले (Ram Navami)
राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या प्रसंगाने आणि अग्निपुरुष प्रकट झाल्याचे नृत्य सादरीकरणाने नृत्य नाटिकेची जोरदार सुरुवात झाली. नृत्य आणि नाट्य यातून ही कथा हळूहळू फुलू लागली. रामजन्म, माता कौसल्याने बाळ रामाचे केलेले संगोपन तसेच स्वयंवर, वनवास, भरतभेट, सीता हरण, रावण वध हे प्रसंग अक्षरशः जिवंत झाले. सर्व उपस्थित भाविक, भक्तगण, प्रेक्षक ताल्लिन होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. वानरसेना स्टेज वर नाचताना तर उपस्थितांच्या ‘प्रभू श्रीरामचंद्रकी जय’ अशा घोषणांच्या आवाजाने आसमंत दुमदुमला. सर्व उपस्थित भक्तिभावात राममय होऊन गेले होते. श्रीराम अयोध्येत परतले या प्रसंगाने व त्रिवार जयजयकार या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय निर्मित आज अयोध्या सजली ही नृत्य नाटिका विद्यालयाच्या वतीने गेल्यावर्षी गोव्यातही अनेक मान्यवरांच्या समोर सादर झाली होती. या नृत्य नाटिकेचा हा चौथा प्रयोग यशस्वी झाला. ही रामंदिरात समर्पित केलेली सेवा आज खऱ्या अर्थाने रुजू झाली आहे असे प्रतिपादन विद्यालयाच्या संचालिका नृत्य तपस्वी वर्षा चंद्रकांत पंडित यांनी केले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या नृत्यासाठी नगरचे नामवंत गायक कलाकार प्रा.आदेश चव्हाण, गौरी बिडकर, अनघा रासने यांनी गायन केले तर तबला साथ प्रभुनाथ संगीत विद्यालयाचे संचालक गुरु संजय हिंगणे व त्यांचे विद्यार्थी शुभम राऊत, आनंद ऋषी, तबला व ढोलक प्रीतम गायकवाड, प्रणव हिंगणे, तालवादक श्रीराम पांढरे तर की पॅड राजेश देहाडे व ऑक्टोपॅड वर निलेश सोज्वळ यांनी वादन केले. आनंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या गायन शाखेच्या श्रीयांश घोडके याने नृत्यासाठी बोलाची पढंत गायन करून सर्वांची वाहवा मिळवली.
विद्यालयाच्या भरतनाट्यम शाखेच्या ५३ विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यात आस्था पिंगळीकर, गोजिरी भावसार, चैत्राली क्षीरसागर, गौरी साठ्ये, दर्शना दंडवते, रिया सरोवरे, ईश्वरी काळे, धनश्री मिसाळ, रुचिता ससाणे, सृष्टी गंधे, समृद्धी कुटे, अनन्या तुंगार , मुग्धा देवचके , वैदेही रोकडे, राजेश्वरी खडके, आर्या दहिफळे, तनिष्का शेळके, नीलाक्षी शर्मा, परीजा मगर, चैत्रवणी ताटी, गिरिजा रायकर, श्रावणी बनकर, दुर्वा गायकवाड, ध्रुवी पोटे, सेजल क्षीरसागर, पूर्वा म्याना, कार्तिकी गुंजाळ, आरोही साबळे, नेहा ओहोळ, तनया येनगूल, रेवती घोटनकर, मृणाली नवले ,अक्षरा ठाकरे, देविका साळुंके, ज्ञानेश्वरी झगडे, लक्ष्मीप्रिया पंतम, कल्याणी मोरे, तितिक्षा चौरे,अन्वी भोईटे, मुग्धा भालेराव, अनया शेळके, प्रन्वी पिसाळ, दर्शना धुमाळ, दिशा विधाते, नव्या वाघमारे, श्रीनिधी वाघमारे, स्वस्तिका गोरे, वेदिका साठे, कार्तिकी शिंदे, आराध्या डोमे, माहिरा डोमे, आरोही चोपडा, तनुष्का वरे आदी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांचे पालक तसेच शरद देशपांडे, अशोक गांधी जरीवाला, विलास बडवे, योगेश पंडित आदी उपस्थित होते. डॉ. सी.बी. कुलकर्णी यांच्या कृपाशीर्वादाने व सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य आम्ही पुन्हा उचलू शकलो. त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद आमची संगीत सेवा रामाच्या चरणी रुजू झाली अशा शब्दात विद्यालयाचे सह संचालक चंद्रकांत पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.