Ram Navmi 2024: अयोध्येत रामनवमीनिमित्त तब्बल ‘एवढ्या’ किलोंचे लाडू पाठवले जाणार

राम मंदिरात रामनवमीच्या उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. याचसाठी देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने १ लाख ११ हजार ११ लाडूंचा प्रसाद अयोध्येत पाठवण्यात येणार आहे.

0
Ram Navmi 2024
Ram Navmi 2024

नगर  : सध्या देशभरात रामनवमीचा (Ram Navmi 2024) उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या १७ एप्रिलला संपूर्ण देशभरात रामनवमी साजरी केली जाणार आहे. अयोध्येतील राममंदिरात मोठ्या भक्तीभावाने रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. आता या रामनवमीसाठी १ लाख ११ हजार १११ किलो लाडू प्रसादासाठी अयोध्येतील (Ayodhya) राममंदिरात पाठवण्यात येणार आहे.

नक्की वाचा : घरच्या मैदानावर मुंबईचा चेन्नईकडून पराभव; रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ

देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने १ लाख ११ हजार ११ लाडूंचा प्रसाद (Ram Navmi 2024)

समोर आलेल्या माहितीनुसार, राम मंदिरात रामनवमीच्या उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. याचसाठी देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने १ लाख ११ हजार ११ लाडूंचा प्रसाद अयोध्येत पाठवण्यात येणार आहे. याबाबत ट्र्स्टचे अध्यक्ष अतुल कुमार सक्सेना यांनी माहिती दिली आहे. देवरा हंस बाबा ट्र्स्टच्या वतीने १,११,१११ किलो लाडूंचा प्रसाद अयोध्येत पाठवण्यात येणार आहे. तसंच लाडूचा प्रसाद दर आठवड्याला देशभरातील विविध मंदिरात पाठवला जातो. तिरुपती बालाजी, काशी विश्वनाथ मंदिर, तिरुपती बालाजी अशा सर्व मंदिरात हा प्रसाद दिला जातो. २२ जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देखील ट्रस्टने ४० किलो लाडू वाटले होते.

अवश्य वाचा : ‘रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

रामनवमीनिमित्त जवळपास ५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता (Ram Navmi 2024)

ram mandir

यंदा अयोध्येत राम मंदिर झाल्याने भाविकांमध्ये रामनवमीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. पाचशे वर्षांनंतर अखेर अयोद्धेत राम मंदिर उभारण्यात आले आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. रामनवमीनिमित्त जवळपास ५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्याकरता विविध उपाययोजना आखल्या आहेत. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here