Ram Shinde : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव

Ram Shinde : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव

0

Ram Shinde : नगर : जामखेड बाजार समितीचे उपसभापतीचे उपसभापती कैलास वराट यांच्याविरूध्द अविश्‍वास प्रस्ताव आज (ता.३०) जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, खरेदी विक्री संघ, कर्जत दूध संघ, नंतर आता जामखेड बाजार समिती (Jamkhed Market Committee) मध्ये विधान परिषदेचे (Legislative Council) सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना सहावा धक्का दिला आहे.

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका

जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल

शरद कार्ले, सचिन घुमरे, नंदकुमार गोरे, अंकुश ढवळे, विष्णू भोंडवे, गौतम उतेकर, गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, राहुल बेदमुथ्था, रवींद्र हलगुंडे, सीताराम ससाणे, नारायण जायभाय या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. त्यात म्हटले आहे की, वराट यांनी कायद्याचे उल्लंघन करून विश्‍वास गमावलेला आहे. ते मनमानी पध्दतीने कारभार करतात. बाजार समितीच्या उपविधी प्रमाणे कामकाज करताना हेतूपूर्वक आम्ही सुचवलेल्या बाबींकडे दुर्लक्ष करून हेळसांड करतात. बाजार समितीमध्ये येणार्‍या शेतकर्‍यांना, नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून सदस्यांनी सुचवलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करतात.

अवश्य वाचा : महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणार : अनिल मोहिते

पदावरून हटवण्यासाठी सभा बोलावण्याची मागणी (Ram Shinde)

बाजार समितीच्या क्षेत्रातील बाजाराची आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या मालाला व्यवस्थित सोयी सुविधा करण्यासाठी कोणतीही मदत करत नाहीत. शासनाकडून वेळोवेळी निश्‍चित करण्यात आलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी व विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही मदत करत नाहीत. त्यामुळे उपसभापती कैलास वराट यांनी सदस्यांचा विश्‍वास गमावलेला आहे. त्यांना उपसभापतीपदावरून हटवण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी करत आहोत.