Ram Shinde : यश केवळ वैयक्तिक नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी – राम शिंदे

Ram Shinde : यश केवळ वैयक्तिक नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी - राम शिंदे

0
Ram Shinde : यश केवळ वैयक्तिक नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी - राम शिंदे
Ram Shinde : यश केवळ वैयक्तिक नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी - राम शिंदे

Ram Shinde : नगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (Maharashtra Public Service Commission) स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे ही केवळ वैयक्तिक सिद्धी नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले, याचा आम्हाला अभिमान आहे. आजच्या पिढीतील मुलींनी उच्च शिक्षण घेत, प्रशासनात योगदान द्यावे, ही काळाची गरज आहे आणि ऋतुजाने त्याचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे (Legislative Council) सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले.

ऋतुजा साठे यांचा राम शिंदे यांच्या हस्ते गौरव (Ram Shinde)

एमपीएससी २०२३ परीक्षेत सहाय्यक अभियंता पदावर निवड झालेल्या कु. ऋतुजा अविनाश साठे यांचा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सिव्हिल बी.टेक शिक्षण घेतलेल्या ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण आठरे पाटील पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे झाले. तिचे वडील अविनाश रघुनाथ साठे के. एस. बी लिमिटेड, वांबोरी येथे कामगार असून, आई सविता साठे प्राथमिक शिक्षिका आहेत. या कार्यक्रमाला अभिषेक धामणकर, संग्रामसिंह पवार, नवनाथ ठोंबरे, पत्रकार निशांत दातीर आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या ऋतुजा कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यरत आहे.