Ram Shinde : अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी : सभापती शिंदे

Ram Shinde : अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी : सभापती शिंदे

0
Ram Shinde : अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी : सभापती शिंदे
Ram Shinde : अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी : सभापती शिंदे

Ram Shinde : नगर : आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषदेचे (Maharashtra Legislative Council) सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले.

नक्की वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे पालखी सोहळा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे आयोजित पालखी सोहळा व अभिवादन कार्यक्रमात प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्रीराम पुंडे, सुनील वाघ, चिमण डांगे, नानासाहेब कोपनर, अभिमन्यू सोनवणे, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, तेजस देवकाते आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह

प्रा. राम शिंदे म्हणाले, (Ram Shinde)

अहिल्यादेवी होळकर यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी इच्छा होती. त्या अनुषंगाने चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ६८१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. या निधीतून भव्य राष्ट्रीय स्मारक, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची सचित्र माहिती देणारी विकासकामे करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने चौंडी येथे सुत गिरणी उभारणीसाठी ११८ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून पुढील वर्षी हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष गिरणी सुरू होणार आहे. 


अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीसाठीही शासनाने मान्यता दिली असून बहुभाषिक या चित्रपटाच्या निर्मितीसाठीच्या २१ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. चौंडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास २०७ कोटी रुपयांतून करण्यात येत असून वर्षभरात रस्त्यांची कामे पूर्ण होतील. कुकडीचे पाणी सीना नदीमध्ये आणून १५० कोटी रुपयांच्या बुडीत बंधाऱ्याद्वारे स्मारकाच्या परिसरात पाणी पोहोचवण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास केवळ १६ महिन्यांत यश मिळाल्याचे त्याने सांगितले.