Ram Shinde : कर्जत-जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजूर : आमदार प्रा. शिंदे

Ram Shinde : कर्जत-जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजूर : आमदार प्रा. शिंदे

0
Ram Shinde : कर्जत-जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजूर : आमदार प्रा. शिंदे
Ram Shinde : कर्जत-जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजूर : आमदार प्रा. शिंदे

Ram Shinde : कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात (Assembly constituency) खरीप हंगाम 2023 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती व पीक काढणीच्या वेळेस झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पीकविमा (Crop insurance) मंजूर व्हावा, यासाठी आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. त्याला मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने कर्जत जामखेड मतदारसंघासाठी 12 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली.

अवश्य वाचा : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर

2023 च्या खरिप हंगामात दुष्काळजन्य परिस्थिती

कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये 2023 च्या खरिप हंगामात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खरिप पिके वाया गेली होती. त्याचबरोबर जे काही पिके उगवून आली होती ते काढणीवेळी झालेल्या पावसामुळे वाया गेली होती. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली होती. खरिप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. खरिप हंगामातील पिके वाया गेल्यामुळे नुकसान भरपाईपोटी मिळणारा पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.

नक्की वाचा : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन

शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यास सुरुवात (Ram Shinde)

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी महायुती सरकारकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु ठेवला होता. 2023 च्या खरिप हंगामाचा पीक विमा मंजूर करून आणण्यात आमदार शिंदे यांना मोठे यश मिळाले आहे. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत- जामखेड मतदारसंघासाठी एकूण 12 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविमा कंपनीने मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.


जामखेड तालुक्यासाठी 7 कोटी 8 लाख 36 हजार 446 रूपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. तर कर्जत तालुक्यासाठी 5 कोटी 60 लाख 24 हजार 793 रूपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. ही सर्व रक्कम मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीकविमा मंजूर केल्याबद्दल मतदारसंघातील शेतकरी बांधवांकडून आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here