Ram Shinde : नगर : शहरात आपली संकृती टिकण्याबरोबरच विकासही होत आहे. शहर पुढे जाण्यासाठी नव्या पिढीला आपल्या पूर्वजांचे शौर्य, पराक्रमाचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. शिववरद प्रतिष्ठान गणेशोत्सवात दरवर्षी इतिहासातील घटनांचेसादरीकरण भव्य पौराणिक व ऐतिहासिक (Historical) देखाव्यातून उत्कृष्टपणे करत आहे. छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन हा इतिहास व संस्कृती जपत सर्वांनी भविष्याकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे साभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले.
नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार
देखावा पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी
गणेशोत्सवानिमित्त रंगार गल्ली येथील शिववरद प्रतिष्ठानने सादर केलेल्या शाहिस्ते खानाची फजिती या भव्य ऐतिहासिक देखाव्याचे उदघाटन सभापती राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी सभापती व मंडळाचे संस्थापक किशोर डागवाले, माजी नगरसेवक संभाजी लोंढे, सुवेंद्र गांधी, प्रा.माणिक विधाते, दत्ता मुदगल, अजय चितळे, दत्ता गाडळकर, बाळासाहेब भुजबळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी हिंदवी शौर्य ढोल पथक, पोतराजाचे असूड नृत्य व नाचणारा घोडा यांचे सादरीकरण व देखावा पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Ram Shinde)
समजला दिशादर्शक देखावे सादर होणे आवश्यक आहेत. हीच परंपरा शिववरद प्रतिष्ठान वर्षानुवर्षे जपली जात आहे. या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी किशोर डागवाले कायम माझ्याकडे पाठपुरावा करत असतात. त्यामुळेच येथील भुयारी गटारीचा प्रश्न मार्गी लागला असून सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते झाले आहेत.