Ram Shinde : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस

Ram Shinde : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस

0

Ram Shinde : कर्जत : जामखेडमधील सभेत विधान परिषद सभागृह, सभापती (Legislative Council Speaker) आणि परिषदेच्या आमदारांविरूद्ध अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत हौसराव मोरे (रा. रत्नापूर, ता. जामखेड) यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि श्रीकांत भारतीय यांनी दिलेल्या सूचनेवरून विधान मंडळाच्या अवर सचिव संगीता विधाते यांनी ही नोटीस पाठवली आहे. मोरे यांना २ डिसेंबरपर्यंत खुलासा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई

अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थितीत घडला प्रकार

२३ नोव्हेंबर रोजी जामखेड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत सूर्यकांत मोरे यांनी सभापती शिंदे यांच्यावर टीका करताना संपूर्ण सभागृह आणि आमदारांचाही अवमान केला. खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे स्टेजवर असताना हा प्रकार झाला.

Ram Shinde : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस
Ram Shinde : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस

अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन

पुढील कारवाई सुरू (Ram Shinde)

याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार दरेकर आणि भारतीय यांनी यासंबंधी विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली. त्यानुसार पुढील कारवाई सुरू झाली आहे. आमदार दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. मोरे यांच्यासोबतच स्टेजवर बसलेले लोकप्रतिनिधींनाही दरेकर यांनी जबाबदार धरत सभागृहात अवमान केला जात असताना मोरे यांना रोखले का नाही, असा सवाल केला आहे.