Ram Shinde : रोहित पवारांना त्यांचा पराभव दिसू लागलाय; राम शिंदेंनी साधला निशाणा

Ram Shinde : रोहित पवारांना त्यांचा पराभव दिसू लागलाय; राम शिंदेंनी साधला निशाणा

0
Ram Shinde : रोहित पवारांना त्यांचा पराभव दिसू लागलाय; राम शिंदेंनी साधला निशाणा
Ram Shinde : रोहित पवारांना त्यांचा पराभव दिसू लागलाय; राम शिंदेंनी साधला निशाणा

Ram Shinde : कर्जत : जामखेड मध्ये राजकीय (Political) वातावरण तापले असताना सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे

राम शिंदे म्हणाले की,

2019 आणि 2024 मध्ये रोहित पवार यांनी पैशाच्या जोरावर विजय मिळवला. ज्यांच्या आधारावर ते निवडून आले, ते सर्व सहकारी आज भाजपात आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवार मिळाला नाही. त्यांची कार्यपद्धती आणि मतदानावर प्रभाव टाकण्याचे तंत्र लोकांना कळले आहे. शिंदेंनी आरोप केला की, नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीदरम्यान अनेक पैशांच्या गाड्या अडवण्यात आल्या, काही गाड्या परतही पाठवण्यात आल्या. या पैशांच्या जोरावर  2024 मध्ये त्यांना विजय मिळाला. परंतु आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. त्यांना आज त्यांचा पराभव दिसत आहे, त्यामुळेच रोहित पवार असे वक्तव्ये करत आहेत असे ते म्हणाले.

अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?

रोहित पवार मात्र कायमच आरोप-प्रत्यारोपात अडकलेले (Ram Shinde)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. कोणावरही व्यक्तिगत टीका न करता त्यांनी सकारात्मक राजकारण ठेवले. पण रोहित पवार मात्र कायमच आरोप-प्रत्यारोपात अडकलेले दिसतात. महाविकास आघाडीच्या काळात कर्जत-जामखेड डॉन-गुंडांचा झाल्याची भावना नागरिकांमध्ये तयार झाली, असा गंभीर आरोपही शिंदेंनी केला. रोहित पवार यांच्या सभांमध्ये अधिकाऱ्यांना झापण्याचा प्रकार अनेकदा दिसला. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल असंतोष आणि चीड निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटले. शेवटी राम शिंदे म्हणाले, ज्या थोड्याशा फरकाने माझा पराभव झाला, त्याचं बदला नागरिक आता घेणार आहेत.