
Ram Shinde : नगर : मौजे नाहुली, सांगवी, चोंडी, आपटी (ता. जामखेड) येथील सहकारी संस्थांचे जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडणे व सहकार विभागाकडे नोंदणी या संदर्भातील आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या लक्षवेधी सूचनेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक विधानपरिषद (Legislative Council) सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात घेण्यात आली.
अवश्य वाचा: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या त्या पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!
सहकारी संस्थांच्या नोंदणीतील तांत्रिक बाबींचा आढावा
या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सहकारी संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
हे देखील वाचा: अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल त्या दोघांनी बोलायला हवं होत, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं
यावेळी प्रा. शिंदे यांनी निर्देश दिले की, (Ram Shinde)
येत्या चार दिवसांत सर्व तांत्रिक बाबींचे निराकरण करून या संस्थांची नोंदणी पूर्ण करावी, तसेच संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही गतीने पार पाडावी.
नक्की वाचा: पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास होणार कारवाई


