Ram Shinde : नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी कामांचा विधान परिषद सभापतींकडून आढावा

0
Ram Shinde : केसनंद येथील 65 एकर जमीन प्रकरणी 8 दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे सभापतींचे निर्देश
Ram Shinde : नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी कामांचा विधान परिषद सभापतींकडून आढावा

Ram Shinde : नगर : नागपूर (Nagpur) येथील विधानभवन विस्तार प्रकल्प तसेच मुंबई (Mumbai) येथील मनोरा आमदार निवास, अजंठा बंगला पुनर्बांधणी आणि मॅजेस्टिक इमारत पुनर्बांधणी कामाचा विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज सविस्तर आढावा घेऊन या नवीन इमारती सर्व सुविधायुक्त, दर्जेदार होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.

नक्की वाचा: दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

या इमारतींच्या बांधकाम आढावा बैठकीत नागपूर विधानभवन विस्तारांतर्गत प्रस्तावित नवीन इमारत, मनोरा आमदार निवास, अजंठा बंगला पुनर्बांधणी आणि मॅजेस्टिक इमारत पुनर्बांधणी बांधकामासंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

बांधकाम वेळेत पूर्ण करा

या इमारतींचे बांधकाम करताना गुणवत्ता, सुरक्षितता व वेळेचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रकल्पाची वेळेत पूर्तता होण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्यात यावी. नागपूर विधानभवन विस्तार प्रकल्पाचा आढावा घेताना सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले, नवी इमारत सर्व सुविधायुक्त असावी. अंतर्गत व्यवस्था दर्जेदार असाव्यात.

पुनर्बांधणी प्रकल्पांचाही आढावा (Ram Shinde)

मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी प्रकल्पाचा आढावा बैठकीत पुनर्बांधणीच्या कामाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली प्रगती, उर्वरित कामांचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.आमदारांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने विहित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी सुचित केले. तसेच या इमारतीच्या बांधकामाचे त्रयस्थ व्यक्ती अथवा संस्थेकडून ऑडिट करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

नक्की पहा: दादांची खुर्ची पाहुन आई अन् पार्थ पवारही रडले

अंजठा बंगला आणि मॅजेस्टिक इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पांचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. अंजठा बंगल्याच्या पुनर्बांधणीसाठी त्याचे ऐतिहासिक व प्रशासकीय महत्त्व लक्षात घेऊन काम करण्याचा सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.