Ram Shinde : कर्जत : माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदेंना (Ram Shinde) काल (मंगळवारी) संध्याकाळी विधान परिषद (Legislative Council) सभापतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याचा आज (बुधवारी) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप (BJP) आणि महायुतीकडून फटाके फोडून तसेच पेढे भरवत जल्लोष करण्यात आला.
अवश्य वाचा : महानगरपालिकेच्या १०० बेडच्या अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
राम शिंदेंनी सभापती पदाचा अर्ज दाखल केला
माजीमंत्री तथा आमदार प्रा राम शिंदेंना विधान परिषद सभापतीची उमेदवारी जाहीर झाली. आज (बुधवारी) सकाळी प्रा. राम शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सभापती पदाचा अर्ज दाखल केला. कर्जत भाजप आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करत जल्लोष केला. यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, शिवसेना शिंदे गटाचे बापूसाहेब नेटके, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादा सोनमाळी, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, उपसभापती अभय पाटील, अशोक खेडकर, चिंतामणी मुरकुटे, गणेश क्षीरसागर, सुनील यादव, दत्तात्रय मुळे, काका धांडे, बंटी यादव, महेंद्र धांडे, काका ढेरे आदी उपस्थित होते. यावेळी राम शिंदे यांच्या समर्थनार्थ उपस्थित पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त करण्यासाठी सहकार्य राहील – संग्राम जगताप
कर्जत-जामखेडसाठी कौतुकास्पद – शेखर खरमरे (Ram Shinde)
प्रा. राम शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार असून शिंदे यांच्या अडचणीच्या काळात वेळोवेळी त्यांनी संकटमोचक म्हणून भूमिका बजावली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंनी आमदार रोहित पवारांना काटे की टक्कर देत मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत श्वास रोखयला लावला. अखेरच्या क्षणी अवघ्या १ हजार २४३ मतांनी त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुन्हा एकदा राम शिंदेंवर मोठा विश्वास टाकत विधान परिषद सभापतीची माळ गळ्यात टाकली याचा कर्जत-जामखेडकरांना अभिमान आहे, असे शेखर खरमरे यांनी सांगितले.