Ram Shinde : नगर : महापालिका (AMC) प्रशासनाने गणेश मूर्तिकारांना नोटीसा बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तिकार (Ganesh sculptor) संघटनेने महाराष्ट्र (Maharashtra) राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांची भेट घेऊन महापालिकेच्या वतीने होणारी कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पीओपी मुळे कुठलेही प्रदूषण होत नाही, असे ही निवेदनात म्हटले आहे.
नक्की वाचा : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक
मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर, उपाध्यक्ष सुशील देशमुख, संतोष रायपिल्ली, भाजपचे कार्यकारणी सदस्य वसंत लोढा, केतन सोनवणे, संजय देवगुणे, संदीप सुसरे, ज्ञानेश्वर राजापुरे, सुवास ठाकूर, विवेक लोटके, उदय अनभुले आदींसह गणेश मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री
मुर्त्यांच्या एक दिवसीय विसर्जनाला टार्गेट केल्याचा आरोप (Ram Shinde)
मूर्तिकार संघटनेने यापूर्वी महापालिकेला पी. ओ. पी. प्रदूषण करत नसल्याचे पुरावे सादर केलेले आहेत. तसेच इतर कंपन्यांकडून नद्यांमधे केमिकल युक्त पाणी दररोज सोडले जाते. तसेच उसकारखान्याच्या मळीयुक्त पाण्याचाही त्यात समावेश असतो. आणि महत्वाचे म्हणजे शहरी वस्तीतील सांडपाणी, ड्रेनेजचे पाणी सर्रास दररोज नद्यांमध्ये सोडले जाते त्या विषयी प्रदुषणाची गंभीर समस्या रोज उद्भवत असतांना आमच्या मुर्त्यांच्या एक दिवसीय विसर्जनाला का टार्गेट केले जाते?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.