Ramadan Eid : कर्जत शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात

Ramadan Eid : कर्जत शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात

0
Ramadan Eid
Ramadan Eid : कर्जत शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात

Ramadan Eid : कर्जत: कर्जत शहर (Karjat city) आणि तालुक्यात (रमजान ईद) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज (Community prayer) पार पाडली. यावेळी तमाम मुस्लिम बांधवांनी विश्वशांतीसाठी दुवा मागितली. शेवटी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत रमजान ईदच्या (Ramadan Eid) शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ घोटाळा प्रकरण; पाच आरोपींना जन्मठेप

मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण

बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद (Ramadan Eid)ची तयारी सुरू झाली. ३० दिवसाच्या निरंक रोजाननंतर रमजानची सांगता गुरुवारी झाली. सकाळी ८:३० वाजता कर्जत येथील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवानी ईद उल फित्रची सामुदायिक नमाज आणि खुदबा पठण मौलाना युसूफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू

यांची उपस्थिती (Ramadan Eid)

यावेळी आमदार रोहित पवार, नीलेश लंके यांच्यासह पोलीस निरीक्षक मारुती मुलूक, भाजपाचे प्रवीण घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, संत सदगुरु गोदड महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, युवक काँग्रेसचे सचिन घुले, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, अमृत काळदाते, संतोष मेहेत्रे, माजी सरपंच शिवाजी फाळके, तात्यासाहेब ढेरे, माजी सरपंच काका धांडे, अ‍ॅड. उत्तम नेवसे, अ‍ॅड. संजीवन गायकवाड, सतीश समुद्र आदींनी ईदगाह मैदानात येत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here